नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 10 ते 15 जणांचा चावा घेतला. जखमींमध्ये पाच लहान मुलांसह एका शालेय मुलाचा समावेश आहे. जखमी नागरिकांमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या भाविकांचा समावेश आहे.
घटनेनंतर जखमींना तत्काळ त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
या पिसाळलेल्या कुत्र्याने अंधाधुंद हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.