रत्नागिरी: जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम 2021अंतर्गत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आता खासगी दवाखाने आणि पॅथॉलॉजी लॅब्सना रुग्णांची माहिती आणि त्यांच्या सेवांचे दरपत्रक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कोणकोणती माहिती देणे आवश्यक?
खासगी डॉक्टरांनी खालील आजारांचे रुग्ण आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे:कॉलेरा (पटकी), प्लेग, घटसर्प, डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग (टीबी), स्वाईन फ्ल्यू (एच१एन१)
1.नवजात बालकांचा धनुर्वात, जॅपनीज इन्फेफलायटिस, कावीळ, गॅस्ट्रोएंटरायटीस
2.एचआयव्ही तपासणीचे आकडे, गरोदर मातांच्या तपासण्या
3.गर्भाच्या लिंगासह गर्भपाताची नोंद
4.दरपत्रक लावणे बंधनकारक
खासगी हॉस्पिटल्सना त्यांच्या सर्व सेवा आणि शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. यामध्ये प्रवेश शुल्क, आंतररुग्ण दर, शस्त्रक्रिया शुल्क, ऑक्सिजन शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, रेडिओलॉजी शुल्क यांचा समावेश आहे.
नियम न पाळल्यास काय होणार?
या नियमांचे पालन न करणाऱ्या डॉक्टरांवर साथरोग अधिनियम १८९७ आणि महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम 2021 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नियमांचे पालन करून कायदेशीर कारवाई टाळण्याचे सुचवले आहे. रुग्णांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी या नियमांचे पालन महत्त्वाचे आहे.