मुंबई : काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा दृश्यम नावाचा चित्रपट आला होता. त्यात चित्रपटाचा नायक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहासह गाडी बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत ढकलून देतो. खाणीत साचलेल्या पाण्यात गाडी पडल्याने अनेक दिवस पोलिसांना त्या मृतदेहाचा तपास लागत नाही, तपासाअंती पोलीस दगडाच्या खाणीतून मृतदेह असलेली कार बाहेर काढतात आणि त्या हत्येचा तपास वेग घेतो, तशीच एक घटना आता गुजरातच्या भिलाडमध्ये घडली आहे. यात शिवेसनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह असलेली ब्रेन्झा कार खाणीतील तलावात पोलिसांना मिळाली आहे. त्या चित्रपटाप्रमाणेच पाण्यात पडलेल्या कारमधून पोलिसांना मृतदेह मिळालाय. आता ही हत्या की अपघात याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. अशोक धोडी राजकीय पदाधिकारी असल्याने याप्रकरणात अनेक तर्कवितर्कांना सुरूवात झालीय.
हेही वाचा : माझ्याविरोधात मिडिया ट्रायल; धनंजय मुंडेंचा आरोप
काय आहे प्रकरण?
अशोक धोडी शिवसेनेचे पदाधिकारी होते. गेल्या 12 दिवसांपासून ते बेपत्ता होते. अपहरण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. भिलाडमधील खाणीजवळ धोडी यांच्या कारचा सेन्सर सापडला. तपास केल्यावर याच खाणीत पाण्यात बुडालेली कार सापडली. कार पाण्याबाहेर काढल्यावर त्यात धोडी यांचा मृतदेह सापडला. हा अपघात की घातपात ? याचा तपास सुरु आहे. पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा धोडी कुटुंबीयांचा आरोप केला आहे.
हेही वाचा : किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई; ममता कुलकर्णीला पदावरून हटवले, कारण काय?
अशोक धोडी यांच्या अपहरणानंतर पोलीस योग्य दिशेने तपास सुरू असल्याचा दावा गणेश नाईक यांनी केला होता. आता धोडी यांचा मृतदेह हाती लागल्याने याप्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.