नितेश राणे यांचा ठेकेदारांवर घणाघात, ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
सत्तेत येताच विकासाला प्राधान्य, नितेश राणेंची ठेकेदारांना कडक सूचना
सिंधदुर्ग : सत्तेत योग्य लोकं असतील तर सर्व कामे सुरळीत सुरू होतात, असे विधान करत पालकमंत्री नितेश राणे यांनी विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाबाबत त्यांनी परखड भूमिका मांडली.
नितेश राणे म्हणाले, “पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन केले, मात्र त्यानंतर वारंवार विमानतळ बंद पडत आहे. याचे कारण म्हणजे उद्घाटन करताना त्यांचा पायगुण योग्य नव्हता. त्यामुळे या विमानतळाच्या पाटीबदलासाठी प्रयत्न करायला हवेत.”
👉👉 हे देखील वाचा : जळगावात गुलियन बॅरी सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा सतर्क!
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विकासकामांबाबत ठेकेदारांचा कामचुकारपणा हा मुख्य अडथळा ठरत आहे. "कोणत्याही कामात जर ठेकेदार वेळकाढूपणा करत असेल, तर त्याला थेट ब्लॅकलिस्ट करा," असा स्पष्ट आदेश मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे. ते म्हणाले, “ब्लॅकलिस्ट करण्यात आमची पीएचडी आहे, विकासाला खीळ घालणाऱ्यांना थोडीही सवलत दिली जाणार नाही.”
गेल्या दहा वर्षांपासून विरोधी बाकावर बसून काम कसे गतिमान करावे, हे शिकल्याचे सांगत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सत्तेत आल्यावर आता कोणतीही अडचण नाही, जनतेचा पैसा बापाचा वाटणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकवला जाईल," असा इशारा देत त्यांनी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.