जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. मात्र आज त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. यावेळी आता सरकार मराठ्यांची ताकद बघेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. धस आणि सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : राज ठाकरे यांचा स्वबळाचा नारा
जरांगेंच्या चार मागण्या सरकारकडून मान्य
कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ दिली. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येणार आहे. मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागे घेण्याची कार्यवाही करण्याला गती देण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षाची कार्यवाही यापुढे चालू राहणार आहे.
हेही वाचा : विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम
जरांगेंच्या उर्वरित मागण्या
आम्ही सगे-सोयरेंचा विषय सोडणार नाही.
त्यावर आक्षेप असल्याने 2 ते 3 महिन्यात ते पूर्ण करा.
मागण्या मान्य केल्या नाहीतर पुन्हा मुंबईला जाणार.
ईडब्लुएसमधून (EWS) घेतलेल्या सवलती जशाच्या तशा ठेवा
शिंदे समितीचे काम राज्यभर सुरू ठेवावे
मोडी लिपी अभ्यासकांना नेमून त्यांचे मानधन द्यावे
आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत