छत्रपती संभाजीनगर : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा ही आग्रही मागणी करत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमधील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सैफ अली खानचे हल्लेखोर दोन दिवसात पकडले जातात. मात्र, बीड प्रकरणात महिन्याभरानंतरही आरोपींवर का गुन्हा दाखल होत नाही, असा सवाल करत तपासाबाबत अंबादास दानवे यांनी शंका उपस्थित केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मोर्चाला मार्गदर्शन करताना मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. बीड प्रकरणी सर्वांनी एकत्र येवून आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, आज देशमुख कुटुंबीयांवर आलेली वेळ तुमच्या- आमच्यावर येवू शकते, त्यामुळे पूर्ण ताकद लावून लढण्याची गरज असल्याचे जलील यांनी सांगितले. परळी मतदारसंघातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल करावा ती आकाची माणसे आहेत असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सैफवर हल्ला झालाय, राज्यात सुरक्षित कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री व्हावा अशी मागणी आंनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
या मोर्चात परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवशींचा भावाने थेट प्रशासनावर हल्लाबोल केला. प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबीयांनी दोन कोटींची ऑफर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : येणारा काळ राष्ट्रवादीचाच, अजित पवारांचा दावा
बीड प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. बीड प्रकरणाचे पडसाद म्हणून धनंजय मुंडेंचा पालकमंत्रीपदाचा पत्ताही कट करण्यात आला असला तरी येथील जनआक्रोश कमी होत नाही.