बीड : भाजपाचे युवा कार्यकर्ते आज देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणून संबोधतात. याची आठवण करून देत कार्यकर्ते आपल्याला शिवगामी म्हणतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल माझ्या मनात ममत्वभाव असल्याचे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या जाहीर भाषणात सांगितले. बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जाहीर भाषणात पंकजा मुंडे यांनी केलेल्या डायलॉगबाजीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
हेही वाचा : खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?
सुरेश धस यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांनीही सिनेमातील डायलॉगबाजी केली.आपण गोपीनाथ मुंडे यांची लेक असल्याने जे बोलतो तेच करते असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी मेरा वचन ही है मेरा शासन असेही म्हटले आहे.
हेही वाचा : गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघालंय. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा गेले काही दिवस चर्चेत होता. बुधवारी झालेल्या बीडमधील जाहीर कार्यक्रमात पंकजा मुडे यांनी मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे कनेक्शन सांगत आपण सर्व कसे भाग्यशाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
या कार्यक्रमात सुरेश धस यांनीही त्यांच्या नेहमीच्या शैलीत सिनेमांची उदाहरणे देत डायलॉगबाजी केली. त्यांनी दीवार सिनेमाचा किस्सा सांगत मेरे पास फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यात पाणी योजनेसाठी मेहनत घेणाऱ्या धस यांची तुलना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पृथ्वीवर गंगा आणणाऱ्या भगीरथशी केली.
हेही वाचा : साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी
बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेनंतर पहिल्यांदाच दौरा केल्याने त्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त झाले होते. मात्र मूळ कार्यक्रमात झालेल्या डायलॉगबाजीमुळे बीडमधील राजकीय तणाव काही अंशी दूर झाल्याचे आज पाहायला मिळाले.