नाशिक : नाशिकच्या आडगाव शिवारात बांधकाम स्थळावर सापडलेल्या बांगलादेशी कामगाराचे प्रकरण समोर आले आहे. या बांगलादेशी कामगारांना आणणाऱ्या म्होरक्याकडे दोन देशांचे पासपोर्ट सापडले आहेत. या प्रकरणात सुमन गाजीसह आलमगीर हुसेनला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरांची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. नुकतच नाशिकच्या आडगाव शिवारात बांधकाम स्थळावर बांगलादेशी कामगार सापडले आहेत. या कामगारांना भारतात आणण्यासाठी सुमन गाजी याने दोन्ही देशांच्या एजंटांना हाताशी धरले आणि त्यांचे पासपोर्ट बनवून घेतले.
हेही वाचा : ‘दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक; ग्रामस्थांनी घेतला निर्णय
सुमन गाजी हा बारा वर्षांपूर्वीच भारतामध्ये आला होता. या प्रकरणात पोलिसांनी म्होरक्या संशयित सुमन गाजी याच्यासह आलमगीर हुसेन याला देखील अटक केली आहे.
नाशिकमधील बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. बारा वर्षात कुणाकुणाला आणले याचा तपास पोलिस करत आहेत. शेकडो बांगलादेशी बांधकाम कामगार भारतात कामाला असू शकतात. मालेगावसोबत नाशिकचे बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाने पोलिसांसमोर मोठी आव्हान उभी केली आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी या बांग्लादेशी लोकांना ताब्यात घेतले होते.
हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा
बांगलादेशींना आणणाऱ्या म्होरक्याकडे दोन देशांचे पासपोर्ट
देशात सातत्याने बांगलादेशी नागरिक असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. बांगलादेशींना भारतात आणणाऱ्या म्होरक्याकडे दोन देशांचे पासपोर्ट सापडले आहेत. सुमन गाजी हा या प्रकरणातील म्होरक्या आहे. गाजी हा बारा वर्षांपूर्वीच भारतात आला आहे. या प्रकरणात पोलिस कसून चौकशी करत आहेत. त्यांनी म्होरक्या संशयित सुमन गाजी याला अटक केली आहे. गाजीसह पोलिसांनी आलमगीर हुसेन याला देखील अटक केली आहे. सुमन गाजी याने दोन्ही देशांच्या एजंटला हाताशी धरून कामगारांचे पासपोर्ट बनवून घेतले आणि कामगारांना भारतात आणले. नाशिक पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांची प्रकरणे समोर आणली आहेत. पोलिसांनी सुमन गाजीला अटक केली असून बारा वर्षात त्याने कोणाकोणाला भारतात आणले याचा तपास पोलिस करत आहेत.