राज्यातील तरुणांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. राज्यात पोलीस भरतीची घोषणा होणार असल्याचं समोर आलंय. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले राजकुमार व्हटकर?
रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
त्याचबरोबर प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे. या पोलिस भरतीची सराव चाचणी ही पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे.