३१ जुलै, २०२४, पुणे : वादग्रस्त सनई अधिकारी पूजा खेडकरचं आयएएस प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही कारवाई केली आहे. यामुळे पूजा खेडकर हिला भविष्यात कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही. तसेच, पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामीनावर गुरुवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीनं काय आदेश दिला आहे ?
१) पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयातील गैरवर्तन, कथित अनियमिततेनं उमेदवारी रद्द
२) UPSC कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला पूजा खेडकरला बसता येणार नाही
३) तपासणीनंतर upscला पूजा खेडकर CSE-2022 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी
४) पूजा खेडकरवर सनदी सेवेत निवड होताना दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
५) वडिलांची कोट्यावधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप