१२ जुलै,२०२४ पुणे : पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही ३०० युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिउबाठाकडून पुण्यात शुक्रवारी, १२ जुलै रोजी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नुकतेच शिउबाठात प्रवेश केलेले वसंत मोरे देखील उपस्थित होते. यावेळेस त्यांनी अतिरिक्त वीजबिल काढणाऱ्या सरकारचा निषेध केला आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळेस, वसंत मोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 'बहिणींना दीड हजार रुपये देता आणि भावांकडून दोन हजार रुपये घेता?' असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. सर्वसामान्य माणूस या दरवाढीने हैराण झालाय. या विरोधात शिउबाठा पुणे शहराच्यावतीने रस्ता पेठेतील पॉवर हाऊस समोर आंदोलन करण्यात आलं. तसेच, गोरगरीब जनतेला ३०० युनिट विज मोफत देण्यात यावी, अशी मागणीही यावेळेस करण्यात आली.