Wednesday, May 21, 2025 01:28:24 PM

पुणे-सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी; चालत्या चारचाकीच्या खिडक्यांमधून बाहेर येत धिंगाणा

तरुणांनी कायद्याचे उल्लंघन करून पुणे-सातारा महामार्गावर हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी चक्क चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येऊन व्हिडिओ बनवला आहे.

पुणे-सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी चालत्या चारचाकीच्या खिडक्यांमधून बाहेर येत धिंगाणा

पुणे: तरुणांनी कायद्याचे उल्लंघन करून पुणे-सातारा महामार्गावर हुल्लडबाजी केली आहे. सध्या, तरुणांच्या या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या तरुणांनी चक्क चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येऊन व्हिडिओ बनवला आहे. इतकंच नाही, तर या तरुणांनी कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यावर देखील डान्स केला आहे. तरुणांची हुल्लडबाजी नवले ब्रिज ते नवीन कात्रज बोगदा दरम्यान सुरू होती. यादरम्यान, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आणि शेअर केला.

नेमकं प्रकरण काय?

16 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास तरुणांनी पुणे-सातारा महामार्गावर धोकादायक हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. महामार्गावरील मुख्य २ लेनवर येताच तरुणांनी चालत्या कारच्या खिडकीमधून बाहेर येत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण करून त्यांनी इतर प्रवाशांचा जीव देखील धोक्यात घालण्याचा प्रकार केला.

व्हिडिओमध्ये तरुणांची हुल्लडबाजी

या महामार्गावरून जाताना एका प्रवाशाने या जीवघेण्या घटनेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये 2 कार स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हुल्लडबाजी होत असल्याचा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण खिडकीच्या बाहेर डोकावून धिंगाणा घालत आहेत, तर काही तरुण कारमध्ये गाणी लावून डान्स करत असताना दिसत आहेत.

तरुणांनी केले कायद्याचे उल्लंघन

चालत्या कारमधून अशा प्रकारची हुल्लडबाजी करणं स्वतःसोबत इतरांच्या जीवाशीदेखील खेळण्याचाही प्रकार आहे. 'व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी या घटनेवर त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी', अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


सम्बन्धित सामग्री