Monday, February 10, 2025 01:02:16 PM

Raj Thackeray Melava Garjana
"शरद पवारांना 10 जागा, अजित पवारांना 42? संशोधनाचा विषय!" - राज ठाकरे

&quotमी अनेक पराभव पाहिले, विजय पाहिले. कधी खचलो नाही, कधी उन्मत्त झालो नाही. कसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. जो ठाम राहील तोच माझ्यासोबत राहू शकतो.&quot

quotशरद पवारांना 10 जागा अजित पवारांना 42 संशोधनाचा विषयquot - राज ठाकरे

राज ठाकरे यांचा मतदान प्रक्रियेवर सवाल: "मतदान आमच्याकडे आलेच नाही!"
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेवर आणि निवडणूक निकालांवर संशय व्यक्त केला आहे. भाजपला 2014 मध्ये 122 जागा मिळाल्या, त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या. त्यामुळे 2024 मध्ये त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकते. मात्र, अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका, कारण लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. मात्र, ते मतदान आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. जर अशाप्रकारे निवडणुका लढवायच्या असतील, तर त्या लढवण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी भाषणात मत व्यक्त केले. या निकालांची ही गोष्ट काही दिवसांत संपेल, कारण कोणीही अमर पट्टा घेऊन आलेले नाही, असे ते म्हणाले.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

शरद पवार यांच्या जीवावर अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी राजकारण केले, मात्र त्यांना केवळ दहा जागा मिळाल्या? हे न समजण्यासारखे आहे, असेही ठाकरे यांनी नमूद करत टीका केली. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले, त्यामुळे आमदार संख्या वाढायला हवी होती. मात्र, काँग्रेसचे केवळ 15 आमदार निवडून येतात? तसेच, शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले असताना त्यांचे केवळ दहा आमदार कसे निवडून आले? असा सवाल त्यांनी राज यांनी केला.

लोकसभेत अजित पवार यांचा केवळ एक खासदार निवडून आला, मात्र त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले? हा विषय संशोधनाचा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यात सन्नाटा पसरला. मिरवणुका निघायला पाहिजेत, जल्लोष व्हायला हवा, मात्र निकाल आल्यानंतर लोक संभ्रमात पडले.

👉👉 हे देखील वाचा : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय बेकायदेशीर? याचिकाकर्त्यांची न्यायालयात धाव

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकाऱ्यानेही निवडणूक निकालांवर प्रश्न उपस्थित केला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सात टर्मपासून ते 70-80 हजार मतांनी जिंकत होते, मात्र आता ते अवघ्या 10 हजार मतांनी पराभूत झाले.

पक्षात लवकरच शिस्त आणण्यासाठी एक आचारसंहिता लागू केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात नेमके काय चालले आहे हे कळावे, यासाठी आवश्यक बदल केले जातील. काही पदांची नावेही बदलली जातील, असेही ठाकरे म्हणाले.

👉👉 हे देखील वाचा : 'महाराष्ट्रात फक्त मराठी माणसानेच माज करायचा'; मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

"मी अनेक पराभव पाहिले, विजय पाहिले. कधी खचलो नाही, कधी उन्मत्त झालो नाही. कसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. जो ठाम राहील तोच माझ्यासोबत राहू शकतो," असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. "आज नाही, उद्या नाही, पण परवा आपण यशस्वी होऊच!" असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


सम्बन्धित सामग्री