Tuesday, December 10, 2024 10:06:26 AM

raj thackeray pune tour
राज ठाकरे घेणार पुरग्रस्तांची भेट

रविवारी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.

राज ठाकरे घेणार पुरग्रस्तांची भेट 
raj thackeray

३ ऑगस्ट, २०२४ पुणे : रविवारी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत. पुण्यातील निंबज नगर एकता नगर आणि पुलाची वाडी या भागात राज ठाकरे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे यांनी शनिवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पुण्यातील पुराबाबत चर्चा केली. या पुरात मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. राज ठाकरे या आधी पूरग्रस्तांच्या भेटीला आले होते तेव्हा 'मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा तुम्हाला निरोप द्यायला येईन', असा शब्द राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिला होता. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo