Sunday, February 09, 2025 04:58:09 PM

Chhatrapati Sambhajinagar
संभाजीनगरात मुलीसोबत धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यातील वडवली येथील एका 21 वर्षीय एअर होस्टेस मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले.

संभाजीनगरात मुलीसोबत धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यातील वडवली येथील एका 21 वर्षीय एअर होस्टेस मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

एका 21 वर्षीय एअर होस्टेसचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विजय शिंदेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास वाकड (पिंपरी चिंचवड पुणे)  पोलिस स्टेशनकडे सोपवला आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील जनआक्रोश मोर्चातून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

पैठण वडवळी येथील रहिवासी असलेली 21 वर्षीय तक्रारदार आणि आरोपी विजय शिंदे यांचे प्रेमसंबंध होते.  प्रेमसंबंधातून आरोपी शिंदेने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले.  पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने ऑगस्ट 2024 मध्ये वाकड येथील डांगे चौकातील भाड्याच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला.  आरोपी शिंदेने पीडितेच्या पालकांना आणि नातेवाईकांना अश्लील व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली. तक्रारदार महिलेला तिच्या वडिलांना फोन करण्याची आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.  शुक्रवारी पीडितेच्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात आरोपी विजय शिंदेविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे ठिकाण वाकड पोलीस ठाणे असल्याने प्रकरण वाकड (पिंपरी चिंचवड पुणे) पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री