Monday, February 17, 2025 01:30:56 PM

Wardha
आकांशा शिशू कल्याण केंद्रातील ‘रुद्र’च्या मृत्यूची पुर्नचौकशी

आकांशा शिशू कल्याण केंद्रात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या रुद्र नामक बालकाच्या मृत्यूचे ठोस कारण व संबंधित प्रकरणी कुणी हयगय केली आदींबाबत राज्य मानव हक्क आयोगाकडून पुर्नचौकशी केली जात आहे.

आकांशा शिशू कल्याण केंद्रातील ‘रुद्र’च्या मृत्यूची पुर्नचौकशी

वर्धा :  सेवाग्राम येथील आकांशा शिशू कल्याण केंद्रात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या रुद्र नामक बालकाच्या मृत्यूचे ठोस कारण व संबंधित प्रकरणी कुणी हयगय केली आदींबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पुर्नचौकशी केली जात आहे. त्या अनुषंगाने त्रि-सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या समितीने मंगळवार 21 जानेवारीला सेवाग्राम येथील आकांशा शिशू कल्याण केंद्र गाठून प्राथमिक माहिती जाणून घेतली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सेवाग्राम येथील आकांशा शिशू कल्याण केंद्रातील रुद्र नामक बालकाचा संशयास्पदरित्या 2 फेब्रुवारी 2017 ला मृत्यू झाला. संबंधित प्रकरण महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाची पायरी चढल्यानंतर राज्याच्या मानव हक्क आयोगाने संबंधित प्रकरणाच्या पुर्नचौकशीच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. संबंधित सूचनांनुसार जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी त्रि-सदस्यीय विशेष चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीने मंगळवार 21 जानेवारीला आकांशा शिशू कल्याण केंद्र गाठून सुमारे दोन तासांच्या काळात मृत रुद्र व त्याची देखभाल कोण व कशी घेत होते याबाबतची प्राथमिक माहिती जाणून घेतली. शिवाय काही दस्तऐवजाची पाहणी केली. ही त्रि-सदस्यीय चौकशी समिती 24 जानेवारीला आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याची शक्यता असून जबाबदार व्यक्तींना लेखी नोटीस बजावून त्यांचे लेखी म्हणने नोंदवून घेणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा : संभाजीनगरात मुलीसोबत धक्कादायक प्रकार

मृत ‘रुद्र’ होता केवळ 34 दिवसांचा

सेवाग्राम येथील आकांशा शिशू कल्याण केंद्रातील रुद्र या बालकाच्या मृत्यू प्रकरणी वर्धा न्यायालयाने चौकशी करून आपला अहवाल 21 नोव्हेंबर 2024 ला राज्याच्या मानव हक्क आयोगाला सादर केला आहे. त्रि-सदस्यीय समितीने मंगळवारी जाणून घेतलेल्या प्राथमिक माहितीत अनेक धक्कादायक बाबी समितीच्या पुढे आल्या आहेत. ज्यावेळी रुद्रचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा तो केवळ 34 दिवसांचा होता असे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री