मुंबई : चार हजार लाडक्या बहिणींनी अर्ज पडताळणीपूर्वीच माघार घेतली आहे. योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. अपात्र महिलांनी स्वत:हून अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पडताळणी पूर्वीच चार हजाराहून अधिक लाडक्या बहिणीनी माघार घेतली असल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज दाखल झाले आहेत. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. 25 जानेवारीपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर 26 जानेवारीला पुढील हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींना देणार आहे. परंतु तत्पुर्वी सरकार अर्जाची पडताळणी करणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना योजनेचे निकष डावलून लाभ घेतला आहे. अशा महिलांचे अर्ज नाकारले जाणार आहेत. अशातच निकष डावलून लाभ घेतलेल्या चार महिलांना सरकारचे पैसे परत केले आहेत.
हेही वाचा : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार
केवळ पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.