Saturday, January 25, 2025 07:30:40 AM

Rohingya started life in Pune by fakeAadhaar card
बनावट आधारकार्ड काढत रोहिंग्याने पुण्यात थाटला संसार

म्यानमारमधून बांग्लादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात वास्तव्यास आलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली. च्या जागेत घर बांधून संसार थाटल्याचे समोर आले आहे.

बनावट आधारकार्ड काढत रोहिंग्याने पुण्यात थाटला संसार

पुणे : म्यानमारमधून बांग्लादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात वास्तव्यास आलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली. च्या जागेत घर बांधून संसार थाटल्याचे समोर आले आहे. विशेष गोष्ट म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. कारवाईनंतर त्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांचा आधार घेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या रोहिंग्याचे नाव मुजल्लीम खान आहे.

बनावट आधारकार्ड काढून जागा विकत घेतली

जुलै महिन्यात चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून पुण्यातील देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आले होते. हे चारही लोक पंडित चाळीत बेकायदेशीरीत्या राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या चार रोहिंग्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्यातील एका मुजल्लीम खान या रोहिंग्याने 80 हजार रूपयांना घर विकत घेऊन चक्क संसार थाटला आहे. बनावट कागदपत्राचा वापर करून मुजल्लीम खान या रोहिंग्याने बेकायदेशीर पद्धतीने जागा विकत घेऊन पुण्यात घर बांधले. मुजल्लीम खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून 80 हजार रूपयांना 600 चौरस फूट जागा खरेदी करत त्या जागेवर घर बांधले.

500 रूपयांमध्ये काढले बनावट आधारकार्ड

भिवंडीत असताना पाचशे रूपये देऊन त्याने आधारकार्ड तयार केलं. आधारकार्ड तयार करून त्याने सर्वांना भारतीय असल्याची ओळख पटवून दिली.

मुजल्लीन खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स पूर्ण केला. तो, त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह म्यानमारमध्ये राहत होता. त्यानंतर 2022 मध्ये तो कुटुंबासह बांग्लादेशात राहायला गेला. मात्र बांग्लादेशात त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो भारतात आला.

भारतातील कोलकत्ता राज्यात खान राहू लागला. तिथेही काम न मिळाल्यामुळे तो थेट पुण्यात राहायला आला. पुण्यात तो बेकायदेशीर राहत होता. पुण्यातील देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता.  

आता मुजल्लीन खान हा जामीनावर बाहेर आहे. परंतु या घटनेतून आजूबाजूचे लोक बेकायदेशीर मार्गाने भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले.


सम्बन्धित सामग्री