मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळताय. अनेक ठिकाणी मूक मोर्चे काढून या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय. त्यातच आता सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकाच ठिकाणी पाहायला मिळाले आहे. खंडणी मागितला त्या दिवशीचा व्हिडिओ समोर आला असून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पाहायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे बालाजी तांदळे, कृष्णा आंधळेही सीसीटीव्हीत एकत्र असल्याचं देखील पाहायला मिळलंय. त्याचबरोबर विष्णू चाटेनं आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं पुराव्यांमध्ये समोर आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया पाहायला मिळताय. वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टोला लागवल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचं खरा गुन्हेगार आहे. पोलिसांसोबत हातमिळवणी करुन खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली आहे. तसेच ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
त्याचबरोबर वाल्मिक कराड छोटा आका आहे. धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, असं सांगितलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.अजून किती पुरावे द्यायचे?, धनंजय मुंडे यांनी उघडपणे वाल्मिक कराड निलंबित राजेश पाटीलला अजून अटक का नाही?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस कोणाता मुहुर्त शोधतायत? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकाच ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर खंडणी मागितला त्या दिवशीचा व्हिडिओ समोर आला असून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पाहायला मिळतंय.