भंडारा : भंडाऱ्यातील आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटानंतर अशा महत्वाच्या कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांमध्ये 10 टक्के तांत्रिक चूक आणि 90 टक्के मानवी चूक आढळून येत असते. भंडाऱ्यात घडलेल्या भीषण स्फोटाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कामगार उपायुक्तां नेतृत्वाखाली २७ जानेवारीपासून चौकशी सुरू होणार आहे.
घटनेची प्राथमिक माहिती
आयुध निर्माणातील एचईएस युनिटमध्ये भीषण स्फोट झाला. काडतुसाच्या स्वरूपातील एलटीपीई हा विशेष दारूगोळा येथे तयार होतो. एलटीपीई तयार करीत असताना स्फोट झाला इतर स्फोटकांच्या तुलनेत एलटीपीईची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
प्रत्येक वेळी स्फोट झाला किंवा दुर्घटना घडल्यावर त्यामागची कारणे व उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते. पण देशभरातील आयुध निर्माणींमधील अपघातांचे सत्र काही थांबत नाहीत, असेच भंडाऱ्याच्या घटनेवरून दिसून येते.
याआधी आयुध निर्माणीतील स्फोट?
यापूर्वी देशातील वेगवेगळ्या आयुध निर्माणीमध्ये स्फोट झालेत
16 एप्रिल 2002 रोजी जबलपूर- खमरिया आयुध निर्माणीत
14 ऑक्टोबर 2015 जबलपूर- खमरिया आयुध निर्माणीत स्फोट
25 मार्च 2017 रोजी याच निर्माणीत भीषण स्फोटांमुळे दोन इमारतींचे नुकसान
15 जून 2017 रोजी पुण्यातील आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाला
9 एप्रिल 2019 कानपूर आयुध निर्माणीमध्ये स्फोट
20 नोव्हेंबर 2018 पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा आगारात स्फोट
22 ऑक्टोबर 2024 रोजी जबलपूर- खमरिया आयुध निर्माणीत स्फोट
हेही वाचा : पुण्यात गुइलेन बेरी सिंड्रोमचे रूग्ण वाढले
आयुध निर्माणीमध्ये दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मितीची प्रक्रिया खूपच संवेदनशील असते. कठोर सुरक्षा नियमावली पाळावी लागते. या स्फोटामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांतील त्रुटी समोर आल्या आहेत.