महाराष्ट्र: महाराष्ट्रात नेहमीच वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच महाविकास आघाडीने आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वतंत्र लादण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु होती ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची. राजकीय वर्तुळात त्याच बरोबर सर्वत्र हीच चर्चा सुरु होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये दिड तास चर्चा चर्चा झाल्याचं समोर आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याबाबत सविस्तर:
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतली. तब्बल दिड तास त्यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जातंय.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक आटोपून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे निघाले. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, 25 जानेवारी रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींला कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान आघाडीत बिघाडाची चर्चा सुरु असतानांच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेऊन दिड तास चर्चा केली आणि महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे.