मुंबई : महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. शिंदे यांच्या वाढत्या नाराजीच्या बातम्यांवरून शिंदे शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडून उदय सामंत यांच्यासह 20 आमदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. सध्या पक्ष फुटीबाबत होत असलेल्या चर्चा आणि मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबाबत येत असलेल्या बातम्या यामुळे कुठेतरी आग असल्याशिवाय धूर येत असावा, त्यामुळे कुठेतरी शिंदेंच्या सेनेत सारं काही आलबेल आहे का हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं आमदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शिंदे शिवेसेनेला डिवचण्यासाठी विरोधकांनी शिवसेना फुटीच्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचे सांगितलंय. उदय सामंत यांच्या मदतीने भाजपा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडविणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विरोधकांकडून सातत्याने होणारा दावा खुद्द उदय सामंत यांनी दावोसमधून प्रतिक्रिया देत खोटा ठरवलाय. महायुतीत सारं काही आलबेल नाही हे खरं असलं तरी विरोधकांकडून ज्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, त्या पूर्ण होणं सध्यातरी भाजपासाठी पोषक नाही. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळालं आहे. त्यामुळे अशाप्रकारे राजकीय भूकंप कऱण्यात भाजपाला स्वारस्य नसल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.