Saturday, March 22, 2025 05:37:54 PM

पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिलह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत धुसफूस सुरू आहे.

पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा

रायगड : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिलह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत धुसफूस सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली आहे. मात्र या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. यावरून महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून चालू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे यांच्या शिवसेनेतील एकही आमदार उपस्थित नव्हता. मात्र मंत्री अदिती तटकरे या उपस्थित होत्या. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रायगड येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.  या बैठकी दरम्यान आमदार भरत गोगावले रायगडमध्येच होते. त्याचबरोबर आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी हे दोघेही रायगडमध्येच होते. परंतु शिंदे यांच्या आमदरांना बैठकीचे निमंत्रण नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचे सत्र सुरू आहे. 

हेही वाचा : 'मुख्यमंत्र्यांवर बोलताना संयम ठेवा' – मंत्री उदय सामंत यांचा जरांगेंना सल्ला

नुकतच रायगडला जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. तसेच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थिती दर्शवली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. तसेच शिवसेनेचा एकही आमदार बैठकीला उपस्थित नसल्याने शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीबद्दल काहीही माहिती नसल्याचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांना सांगितले आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पालकमंत्रिपदावरून असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. मीटिंग ठरलेली तर आम्हाला सांगायला हव होतं. आम्हाला पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्याच आलं असे रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री