Sunday, April 20, 2025 06:08:57 AM

बुधवारी नाशिकमध्ये होणार शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये निर्धार शिबिराचे आयोजन होणार आहे. या शिबिरासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी नाशिकमध्ये होणार शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर

नाशिक: विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये निर्धार शिबिराचे आयोजन होणार आहे. या शिबिरासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिरामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सकाळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमध्ये या निर्धार शिबिराचे उद्घाटन होणार आहे, तर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप होणार आहे. त्यासोबतच, शिवसेना ठाकरे गटातील अन्य नेते आणि पदाधिकारी शिबिराला आलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण देखील दाखवले जाणार आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण या शिबिराचे प्रमुख आकर्षण असणार आहे. बुधवारी, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कशाप्रकारे आपली भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत याच शिबिरासाठी नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.

अशाप्रकारे, असेल या शिबिराचे वेळापत्रक:

सकाळी 9:30 वाजता - प्रसिद्ध शिवशाहीर स्वप्नील डुंबरे शाहिरी सादर करणार.

सकाळी 10 वाजता - युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. यादरम्यान, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी मान्यवरांचे स्वागत आणि प्रस्तावना करतील.

सकाळी 10:30 वाजता - 'आम्ही इथेच' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि खासदार राजाभाऊ वाजे सहभाग घेतील.

सकाळी 11 वाजता - 'महाराष्ट्र कुठे चाललाय?' या विषयावर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आपले विचार मांडतील.

दुपारी 12 वाजता - बूथ व्यवस्था आणि मतदार, आदी विषयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत मार्गदर्शन करतील.

दुपारी 1:45 वाजता - शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे प्रास्ताविक देतील.

दुपारी 2 वाजता - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 'संघटनेचा आत्मा आणि पुनर्बाधणी' या विषयावर आपले विचार मांडतील.

दुपारी 2:45 वाजता - 'मी शिवसेनेसोबतच का?' या विषयावर चर्चासत्र होणार, ज्यामध्ये एकलव्य संघटनेचे पदाधिकारी शिवाजी ढवळे, शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे, माजी महापौर वसंत गीते सहभाग घेतील.

दुपारी 3:15 वाजता - 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हद्दीत घुसखोरी, कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस, फेक नरेटिव्ह आणि लोकशाही' या विषयांवर कायदेतज्ञ असीम सरोदे मार्गदर्शन करतील.

दुपारी 4:15 वाजता - शाहिरी पोवाडा कार्यक्रम होणार.

दुपारी 4:45 वाजता - 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक धगधगता विचार' या चित्रफितीचे सादरीकरण होणार.

सायंकाळी 5 वाजता - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मार्गदर्शन करतील.

सायंकाळी 5:30 वाजता - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.


सम्बन्धित सामग्री