Sunday, February 09, 2025 04:26:59 PM

GONDIA ACCIDENT NEWS
देवरीत घडला चित्तथरारक अपघात, शीर वेगळं झालं; पोलिसांनी पुढे काय केले ?

देवरी शहरातून गेलेल्या चिचगड मार्गावरील सालई परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा शिर वेगळा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

देवरीत घडला चित्तथरारक अपघात शीर वेगळं झालं पोलिसांनी पुढे काय केले

गोंदिया : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड मार्गावरील सालई परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा शिर वेगळा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता घडली होती.

सविस्तर माहिती अशी की, निकेश आत्माराम कहाडे (३२) रा. मोहगाव (आलेवाडा), ता. देवरी, जि. गोंदिया हा MIDC येथून काम संपल्यानंतर आपल्या दुचाकीवर (दुचाकी क्र. MH 35 AV 2968) गावाकडे परत जात होता. यावेळी तो चिचगड रोडवरील सालई गावाजवळ एक ट्रक्टर (बिना नंबर प्लेट) मागे घेऊन जात असलेल्या टिनाचे सेट व अन्य साहित्य घेऊन जात असलेल्या वाहनाला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, निकेशचे मुंडक धडापासून वेगळे झाले आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

👉👉 हे देखील वाचा : पुण्यात मित्राने मैत्रिणीवर केला धारदार चाकूने हल्ला

घटना घडताच ट्रक्टर चालकाने वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार होण्यास यश मिळवले होते, त्यामुळे नागरिकांना घात की अपघात? असा प्रश्न पडला होता. मात्र, देवरी पोलिसांनी तपास सुरू करत ट्रक्टर आणि चालकाचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. ट्रक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी पोलिस करत आहेत.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री