रांजणगाव: रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रांजणगाव येथे एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय. कामगारांनी केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण करण्यात आलीय. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चार जणांविरोधात वेठबिगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी परिसरात काम करणारे अनेक कामगार काही काळापूर्वी स्थानिक कंत्राटदारांच्या अंतर्गत काम करत होते. या कामगारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोबदला मिळत नाही. कामाचे पैसे मागण्यास गेलेल्या कामगारांना कंत्राटदारांनी एका बंद खोलीत डांबून ठेवले आणि त्यांना मारहाण केली.
या घटनेमुळे कामगार वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, या त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी ते एकत्र येऊन न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी करत आहेत. . शासनाने या प्रकरणात कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून कामगारांना न्याय मिळेल आणि अशी घटना पुन्हा घडू नये, अशी कामगार संघटनांची मागणी आहे.
दरम्यान एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय. कामगारांनी केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण करण्यात आलीय. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.