जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून बुधवारी (२३ ऑक्टोबर) सोने भावात ८०० रुपयांची वाढ होऊन ते ७९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली.
इराण-इस्त्रायल वाद व अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीचे भाव वाढतच आहेत. त्यात बुधवारी चांदीच्या भावात १,५०० रुपयांची वाढ होऊन एक लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली. एक किलो चांदीसाठी आता जीएसटीसह एक लाख तीन हजार रुपये मोजावे लागतील. सोने भावातही बुधवारी ८०० रुपयांची वाढ होऊन ते ७९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.