Wednesday, December 11, 2024 11:43:17 AM

Six people lost their lives because of dead woman
मृत महिलेमुळे सहा लोकांना जीवदान

पालघरमध्ये एका महिलेमुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे.

मृत महिलेमुळे सहा लोकांना जीवदान

पालघर : पालघरमध्ये एका महिलेमुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे. 50 वर्षीय महिला घरात काम करताना उलट्या होऊन अचानक डोके दुखू लागले आणि त्यानंतर बेशुद्ध पडली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी तीन दिवस प्रयत्न करूनही ती महिला शुद्धीवर आली नाही. त्यानंतर तातडीने मेंदूचे ऑपरेशन करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी सिटीस्कॅन व ॲप्निया टेस्टद्वारे मेंदूची तपासणी केली असता महिला मेंदूमृत असल्याचे निष्पन्न झाले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगितले. परंतु महिलेच्या नातेवाईकांकडून नकार मिळाला.

रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या सागर वाघ यांनी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांना घडलेली घटना सांगितले. त्यानंतर त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना अवयवदान करण्यासाठी तयार केले. 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या (ZTCC) निर्देशांनुसार रुग्णाच्या अवयवांचे नियमाप्रमाणे मध्यरात्री उशिरापर्यंत वितरण करण्यात आले.

नालासोपाऱ्यातील 50 वर्षीय मृत महिलेची एक किडनी केईएम हॉस्पिटल (परळ) येथे प्रत्यारोपित करण्यात आली. दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल येथील रुग्णावर प्रत्यारोपित केली. जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथील रुग्णावर एक लिव्हर प्रत्यारोपित करण्यात आले. ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरने त्वचा स्वीकारली. रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या टीमने डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा आय बँकेत सुपूर्द केले. एका व्यक्तीच्या अवयवादानामुळे अवयवांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या सहा जणांना नवजीवन मिळाले. या घटनेमध्ये नालासोपाऱ्यातील डॉक्टरांनी कर्तव्य चेख बजावल्याचे दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo