Saturday, February 08, 2025 07:13:53 PM

Somnath Suryavanshi Murder Case
Somnath Suryavanshi Murder Case: सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी नाकारली मदत

संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती . पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

somnath suryavanshi murder case सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी नाकारली मदत

परभणी: संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती . पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर शासनाने सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र आपल्या मुलाचा खून पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने दहा लाख रुपयांची शासकीय मदत नाकारली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती एक महिन्याने गठीत करण्यात आली असून समितीने सहा महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा असे सांगण्यात आलं. मात्र दीड महिन्यात समितीनं अहवाल सादर करण्याची मागणी सूर्यवंशी कुटुंबानं केलीय. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा ही मदत नाकारली असून न्याय देण्याची मागणी त्यांनी केलीय. 

जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा मिळत नाही तो पर्यंत शासकीय मदत स्वीकारणार नसल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नेमकं हे प्रकरण काय वळण घेत हे पाहून महत्वाचं ठरणारे. शासनाने सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली असून सुद्धा दोन वेळा सूर्यवंशी कुटुंबीयांनी ही मदत नाकारलीय. 
 


सम्बन्धित सामग्री