Saturday, January 18, 2025 05:13:35 AM

pune protest
'विनाशकारी विकासखोरी थांबवा , पश्चिम घाट वाचवा' !

पुण्यात जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समिती एकवटली आहे. लवासा आणि हिल स्टेशन धोरणा अंतर्गत असलेले सर्व प्रकल्प तातडीने थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

विनाशकारी विकासखोरी थांबवा  पश्चिम घाट वाचवा
pune protest

५ ऑगस्ट, २०२४, पुणे : पुण्यात जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समिती एकवटली आहे. लवासा आणि हिल स्टेशन धोरणा अंतर्गत असलेले सर्व प्रकल्प तातडीने थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. झाड तोडून डोंगरावर झालेले बांधकाम डोंगरांना ठिसूळ बनवत असून माती मोकळी होत आहे. थोडा जास्त पाऊस पडला तर पोखरून निघालेले डोंगर ते सहन करू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी देशभर दरडी कोसळत आहेत. यामुळे या प्रकल्पाचे पूर्णतः बांधकाम तातडीने थांबवावे. तसेच, हिल स्टेशन पॉलिसी देखील रद्द करावी अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री