Accident On Solapur-Pune highway
Edited Image
Pandharpur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडीजवळ ट्रक, मिनी-बस आणि दुचाकीची धडक झाली. या विचित्र अपघातात मिनी-बस चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच 15 जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावरील कोळेवाडीजवळ ट्रक चुकीच्या लेनमध्ये गेल्याने मिनी-बस उलटली. या अपघातात दुचाकीस्वार, बसचालकासह तिघे ठार झाले. मिनी बसमधील पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मिनी बस मधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. या अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बसचालक लक्ष्मण बासू पवार तसेच 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक
याशिवाय, कोमल अनिल जोरकर, भक्ती पांडुरंग मांढरे, बेबी सुधाकर गायकवाड, अनिता शंकर बारगे, संगीता रवींद्र शेडगे, कोमल सचिन मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश माहिते, अरव अरुण खाडे, परी अनिल जोरकर, सई गौस प्राची पाडुरंग मांढरे, छाया रतन शेडगे, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश माहिते, रेखा दत्तात्रय चौधरी मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, अरव अरुण खाडे हे जखमी झाले आहेत.
हेही वाचा - सरपंच देशमुखांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले; मुख्य आरोपी मोकाट
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसमधील लोक पंढरपूरला दर्शनासाठी जात होते. एम. एच. 12. के. क्यू 11 75 बस सोलापूर-पुणे हायवेवरून पंढरपूरकडे जात असताना कोळेगाव पाटी दरम्यान आली. यावेळी कोळेगाव चौकात कंटेनरने मिनीबसला धडक दिली. या अपघातात रस्त्यावरील दुचाकी स्वार, बसचालक आणि एका महिलाचा मृत्यू झाला.