गेल्या अनेक महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटून येताय. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी देखील अनेक आरोप प्रत्यारोप केले. त्यातच आता आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या कबुलीने सर्वत्र एकचं खळबळ उडालीय.
हेही वाचा: Jayant Patil: जयंत पाटील शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यातच हा आशिष विशाळ माझा सहकारी आहे, अशी कबुली आमदार सुरेश धस यांनी दिल्याने एकंच खळबळ उडालीय.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केले आहे. तो नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि 18 लाखांची कार आली कुठून? हा प्रश्न आहे. आशिष विसाळ हा आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत होता. त्यांच्याकडून खंडणी जमा करत होता. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून तो पैसे गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय त्यामुळे आता हे प्रकरण नक्की काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.