Sunday, May 18, 2025 04:21:28 PM

स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या विकृतीचा पर्दाफाश!

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याच्या विकृती कृत्यांची मालिका समोर आली आहे. दत्ता स्त्रीलंपट आणि सराईत गुन्हेगार असलेल्या गाडेने अनेक महि

 स्वारगेट बलात्कार प्रकरण आरोपी दत्ता गाडेच्या विकृतीचा पर्दाफाश 

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याच्या विकृती कृत्यांची मालिका समोर आली आहे. दत्ता स्त्रीलंपट आणि सराईत गुन्हेगार असलेल्या गाडेने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले असून, तो तृतीयपंथीयांसोबतही संबंध ठेवत असल्याचे धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.

शिरुरमध्ये आरोपीचे घाणेरडे प्रकार!
शिरूर परिसरात गाडेने महिलांचे छुपे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकारही केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक लॉजबाहेर तो बसून महिलांवर पाळत ठेवत असे आणि त्यांचा गैरफायदा घेत असे. त्याचा विरोधात आधीही गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. 

हेही वाचा : Pune Shivshahi Bus Case : आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

स्वारगेटमध्ये नेमकं काय घडलं? 
महाशिवरात्रीच्या रात्री पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी गाडेने अत्याचार करून गाव गाठले. पुणे पोलिसांनी दोन दिवस त्याचा शोध घेतला आणि अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली.

अटक टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न!
पोलिसांच्या भीतीने गाडेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा! त्याने कीटकनाशक पिण्याचा तसेच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगून त्याला रुग्णालयात दाखल केले आणि नंतर कोठडीसाठी हजर केले.गाडेच्या वकिलांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. “हा बलात्काराचा गुन्हा नसून दोघांमध्ये सहमतीने संबंध झाले,” असा दावा केला जात आहे. तसेच, पोलिसांनी आरोपीचा चेहरा मीडिया आणि सोशल मीडियावर दाखवून त्याला सार्वजनिकरित्या दोषी ठरवले, असा आक्षेपही घेतला आहे.

हेही वाचा : पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

पोलिसांचा पुढील तपास सुरू!
या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे कपडे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


सम्बन्धित सामग्री