बीड : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील एक एक गुन्हे समोर येताना दिसत आहेत. तसेच बीडमधील दहशतदेखील समोर येत आहे. अशातच आता बीडमध्ये बँकच्या आवारात शिक्षकाची आत्महत्या झाल्याने संपूर्ण बीड हादरलं आहे.
विनाअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकानं स्वत:च जीवन संपवलं आहे. बीडमधील बँकेच्या आवारात शिक्षकाचा आत्महत्या झाली आहे. 20 टक्के अनुदानाची घोषणा,मात्र अंमलबजावणी नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. या शिक्षकाने एक फेसबुक पोस्ट करत अनेकांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धनंजय नागरगोजे असं शिक्षकाचं नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणला आहे.
हेही वाचा : लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं विद्यार्थीसोबत केला बलात्कार
शिक्षकानं संपवलं जीवन
बीड जिल्ह्यातील केज येथे आत्महत्येची घटना घडली आहे. धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. बँकेच्या प्रांगणात गळफास घेऊन त्याने आत्महत्येची केली. आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली. अनेक वर्षांपासून त्यांचा पगारच झालेला नव्हता. लेकीला लिहिलेल्या पत्रात सहा जणांचा उल्लेख त्याने केला आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.