Saturday, January 25, 2025 08:27:56 AM

'Tejas' plane will take space leap from Nashik
नाशिकमधून ‘तेजस’ विमान घेणार अवकाशी झेप

नव्या पिढीच्या ‘तेजस’ विमानांची बांधणी नाशिकमध्ये होत आहे.

नाशिकमधून ‘तेजस’ विमान घेणार अवकाशी झेप

नाशिक : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या पिढीच्या तेजस विमानांची बांधणी नाशिकमध्ये होत आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब आहे. तेजस विमानाच्या बांधणीकरिता  एचएएलमध्ये तिसरी प्रॉडक्शन लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 60 एचटीटी प्रशिक्षणार्थी विमानांची 6 हजार 800 ऑर्डर एचएएलला मिळालेली असून त्याची बांधणीही सुरू आहे. लवकरच ती हवाईदलाकडे सुपूर्द करण्यात येतील. तेजस विमानाची निर्मिती देखील नाशिकच्या एचएएलमध्ये होणार आहे. त्यामुळे 2025 मध्ये पहिले तेजस विमान नाशिकमधून आकाशात चाचणीसाठी उड्डाण घेणार आहे. विमान निर्मितीचे हे दोन्हीही प्रकल्प नाशिककरिता खूप महत्त्वाचे व मोठे असून त्याकरिता लागणारे सुटे भाग, यंत्रसामग्री स्थानिक पातळीवर उद्योगांकडून मागवली जाणार आहे. त्याचा फायदा स्थानिक उद्योजकांनाच होणार असल्याचे एचएएलकडून सांगण्यात आले आहे.

 

नाशिक, ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या माध्यमातून देशातील सात प्रमुख शहरांना जोडणारी सेवा दिली जात आहे. आगामी काळात आणखी दोन ते तीन शहरे जोडली जावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उड्डाण सेवेत खंड पडू नये, यासाठी एचएएल विमानतळाला समांतर धावपट्टी तयार करणार असल्याचेही चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.

स्वदेशी बनावटीचे हलके 'तेजस एमके -१ ए' या लढाऊ विमानाच्या उत्पादनाला गती देण्यासाठी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात नवी उत्पादन साखळी तयार करण्यात आली आहे. या आधीपूर्वी दोन उत्पादन साखळ्या बंगळुरू येथे आहेत. नाशिकच्या तिसऱ्या साखळीमुळे एचएएलची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 16 ते 24 विमानांनी विस्तारणार आहे. या निमित्ताने सुखोईनंतर नाशिक प्रकल्पात बऱ्याच वर्षांनी लढाऊ विमानाची बांधणी होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

  


सम्बन्धित सामग्री