Thursday, May 01, 2025 06:01:39 AM

दौंड शहरात आढळली दहा ते अकरा अर्भक

पुण्यातील दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली आहेत.

दौंड शहरात आढळली दहा ते अकरा अर्भक

पुणे : पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली आहेत. यामुळे दौंड शहरात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. दौंड शहर परिसरात बेकायदा गर्भपात सेंटरची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दौंड शहरात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. साधारणतः दहा ते अकरा अर्भक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस शोध घेत आहेत. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात नवजात बालकांचे अर्भक सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती कळताच दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. 

हेही वाचा : प्रशांत कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळणार?

दौंड शहरात हे अर्भक सापडल्याने याच परिसरात गर्भपात होत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्व अर्भक प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेअसल्याचे आढळून आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना तात्काळ घटनास्थळी बोलविण्यात आले. या प्रकरणा अधिक तपास पोलिसांनीकडून केला जात आहे. 


 

                    

सम्बन्धित सामग्री