Friday, March 21, 2025 10:10:01 AM

ठाकरेंचे आमदार शिंदेच्या संपर्कात?

महाराष्ट्रात राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे.

ठाकरेंचे आमदार शिंदेच्या संपर्कात

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे. राज्यात ठाकरे गटाचे काही आमदार शिंदेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आलाय. ठाकरे गटाचे सहा आमदार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्यासाचे बोलले जात असल्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: नवा सोपा, सुटसुटीत आयकर कायदा येणार

काय आहे ऑपरेशन टारगर? 

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या निवडणुकीपूर्वी ऑपरेशन टायगर चर्चेत आलं आहे. एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयासाठी ठाकरेंकडील नेते, कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहेत. जर शिंदेसेनेने मुंबई, ठाणेसारख्या महापालिकेत भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले तर उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला जबरदस्त झटका बसण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मुंबई महापालिकेवर 1985 सालापासून ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. जर मुंबई महापालिकेत शिंदेसेना मजबूत झाली तर भाजपासोबत मिळून ते ठाकरेंना सत्तेबाहेर काढू शकतात. त्यामुळे ऑपरेशन टायगर शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवलं जात आहे. त्यात ठाकरेंकडील खासदार, आमदार अन् स्थानिक शिलेदार मोठ्या संख्येने शिवसेनेत घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. 


सम्बन्धित सामग्री