छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 960 अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहाचा अभाव तर अनेक अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची असुविधा जाणवत आहे. जिल्ह्यात एकूण 3839 अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 2024 डिसेंबरच्या अखेरची आकडेवारी पाहता यामध्ये काही अंशत बदल झाला असेल. मात्र त्या आकडेवारीवरून अजूनही बऱ्याच ठिकाणी परिस्थिती जैसे थे असल्याची माहिती आहे. गरोदर, स्तनदा माता आणि शुन्य ते पाच वयोगटापर्यंत बालकांना अंगणवाडीतून विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. अंगणवाडी म्हणजे माता आणि बालकांसाठी महत्त्वाचा दुवा आहे.परंतु जिल्ह्यातील कित्येक अंगणवाड्यात पिण्याचे शुद्ध पाणी नाही. कुठे शौचालय नाही, त्यामुळे लहानग्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते.
शौचालय नसलेल्या अंगणवाड्या
संभाजीनगर - 140
गंगापूर -150
कन्नड- 168
खुलताबाद -51
पैठण-133
फुलंब्री- 58
सिल्लोड-141
सोयगाव -36
वैजापूर - 83
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 960 अंगणवाड्या शौचालयाविना आहेत.