रायगड: पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेल्याच पाहायला मिळतंय. याआधीदेखील नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालाय. त्यातच आता पुन्हा हा वाद विकोपाला गेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय. महायुतीकडून पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली, त्याला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्याकडून
विरोध दर्शवण्यात आलाय. गोगावले समर्थकांनी रास्ता रोकोही केला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याप्रकरणी आता भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामा देतो, असं वक्तव्य केलंय. भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना आव्हान देत मोठं विधान केलेय. आमची एक तरी चूक दाखवून द्या, असे थेट आव्हान गोगावलेंनी तटकरेंना केलेय.
काय म्हणाले भारत गोगावले?
ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आव्हान देतोय, खासदारकीच्या वेळी आमच्याकडून एक जरी चूक झालेली असेल, ती दाखवा. लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा. हे माझं चॅलेंज. ते माझं चुकलं म्हणतात, त्यांनी एकतरी चूक दाखवून द्यावी.
दरम्यान आता रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेला असून नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.