पुणे : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. या हत्येचा व्हिडिओ पतीने बनवला आहे. शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये 4 हजार 200 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू
पुण्यातील खराडीमध्ये पतीने शिलाई मशीनच्या कात्रीनं पत्नीची निघृण हत्या केली आहे. ही हत्या करताना पतीने त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. मुलासमोरच त्याने आपल्या पत्नी हत्या केली आहे. या हत्येचा संपूर्ण तपशील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. शिवदास गीते असं हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. हा व्यक्ती 38 वर्षाचा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
घरगुती भांडणं आणि कोर्टाच्या स्टेनो परीक्षेचा अभ्यास करण्याच्या कारणावरून शिवदास गीते आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. पत्नीची हत्या करून आरोपी शिवदास गीते खराडी पोलीस स्टेशनला सकाळी आठ वाजता हजर राहिला. तर मध्यरात्री तीन-साडेतीन वाजल्यापासून दोघांची भांडणं सुरू झाली होती.