२८ जुलै, २०२४, रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे खेड येथील निळवणे कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठ- मोठ्या भेगा पडल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांतच या भेगा प्रचंड प्रमाणात रुंदावत असून काही भाग खचलाही आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोकणाला अक्षरशः झोडपून काढले आहे. याच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्खलन होण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार खेड तालुक्यातील निळवणे कातळवाडीला जाणाऱ्या डोंगर रस्त्यावर घडला आहे. निळवणे कातळवाडीला जाणाऱ्या डोंगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येथे कोटीही दुर्गाताना गडू नये यासाठी या रस्त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. दिवसागणिक या भेगा वाढत असून त्या रुंदावत आहेत. यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील निळवणे कातळवाडी रस्ता खचल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.