Sunday, April 20, 2025 06:01:17 AM

Balgandharva Natyagruh Controversy: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर रंगयात्रा अ‍ॅपविरोधात आंदोलन

पुणे महापालिकेने रंगयात्रा नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केल्यामुळे प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन होत आहे. मात्र हे आंदोलन नेमकं का होत आहे जाणून घ्या.

balgandharva natyagruh controversy पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर रंगयात्रा अ‍ॅपविरोधात आंदोलन

पुण्यातील तमाम रसिकप्रेमींसाठी बालगंधर्व रंगमंदिर अत्यंत खास आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नाट्यगृहांपैकी एक आहे. 26 जून 1968 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहत असते. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. याठिकाणी, अशोक सराफ, भरत जाधव, प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांसारख्या अनेक मराठमोळ्या कलाकारांनी नाटकांचे प्रयोग सादर केले आहेत. हे ठिकाण पुण्यातील जंगली महाराज रोडवर स्थित आहे. मात्र अलीकडे, पुणे महापालिकेने रंगयात्रा नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केल्यामुळे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन होत आहे. मात्र हे आंदोलन नेमकं का होत आहे जाणून घ्या. 


पुणे महापालिकेने लाँच केले 'रंगयात्रा मोबाईल ऍप्लिकेशन':

घरबसल्या नाट्यगृहाचे बुकिंग करता यावे म्हणून पुणे महापालिकेने रंगयात्रा या मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. संपूर्ण राज्यभरातील नागरिकांना नाटक, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती त्यासोबतच, नाट्यगृहाची असनक्षमता, सोयीसुविधा, उपलब्धता, पत्ता यासह आणखी बरीच माहिती या एप्लीकेशन द्वारे उपलब्ध आहे.


पुण्यात रंगयात्रा अ‍ॅपविरोधात रंगयात्राचे आंदोलन:

या मोबाईल ऍप्लिकेशनला अनेक कलाकार आणि नाटक व्यवस्थापनाकडून विरोध केला जातोय. याचा विरोध म्हणून रविवारी, 16 मार्च 2025 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नाटक व्यवस्थापनाकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे सुद्धा उपस्थित होते.  त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात आंदोलन करण्यात आले. 


'या' कारणांमुळे होत आहे रंगयात्रा अ‍ॅपविरोधात आंदोलन:

रविवारी, 16 मार्च 2025 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नाटक व्यवस्थापनाकडून आंदोलन करण्यात आले. 'नाट्यगृहात फक्त नाटकच चालायला हवीत. नाट्यगृहाला ओपन थिएटरमध्ये रूपांतर करू नका. नाट्यगृहासंबंधी कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी पुणे महापालिकेने कलाकार, नाट्य निर्माते आणि नाट्य व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि त्यानंतरच रंगयात्रा अ‍ॅप री-लॉन्च करावं', असं अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केलं आहे. 


सम्बन्धित सामग्री