२८ सप्टेंबर, २०२४, पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावातल्या, मधुशाला मद्य विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली आहे. मध्यरात्री लोखंडी रॉडच्या साह्यानं दुकानाचे शटर उचकटून, दुकानातली ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. याशिवाय सीसीटीव्हीचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या स्टोरजची हार्ड डिस्क चोरून नेली. मालकाच्या तक्रारीनंतर नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.