Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठे बदल होणार आहेत. निवडणुकीदरम्यान सरकारने दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेच्या घाईघाईने अंमलबजावणीमुळे काही अपात्र महिला देखील लाभार्थी ठरल्या, ज्यामध्ये आता सुधारणा केली जात आहे. हा बदल खरोखरच गरजू महिलांना मदत पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकतो.
आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अहवालांनुसार, ज्या लाखो महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्या स्वतः कमाई करत आहेत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते.
हेही वाचा - 8th Pay Commission: जानेवारी 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल का? अहवाल सादर करण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील बदल -
ज्या महिला खरोखरच गरजू आहेत त्यांनाच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल.
ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.
अपात्र महिलांना मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यात आली आहे.
सरकारने अपात्र लाभार्थी महिलांना स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - काय सांगता!! 10 दिवस अंथरुणावर पडून राहिल्यास तुम्हाला मिळतील 4.75 लाख रुपये! 'ही' कंपनी देत आहे खास ऑफर
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार? -
फक्त महाराष्ट्रातील महिला रहिवासी
वयोमर्यादा: 21 ते 65 वर्षे
वार्षिक कुटुंब उत्पन्न: कमाल 2.5 लाख
ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहन असलेली कुटुंबे अपात्र आहेत.
आयकर भरणारी कुटुंबे अपात्र.
विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना प्राधान्य.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या उद्धेशाने चालवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.