पुणे : पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आले असल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात काका पुतण्या एकत्र पाहायला मिळाले. तसेच कार्यक्रमाच्या आधी त्यांच्या अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. बंद दरवाजाआड त्यांच्यात चर्चा झाली. यावरून राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. आधीही बारामती कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त दोघे एकत्र आले होते. यामुळे पवार कुटुंब एकत्र येईल अशा चर्चा सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे असं साकड विठुरायाला घातले होते. त्यानंतर पवार कुटुंबातील दरी कमी होताना दिसत आहे.
हेही वाचा : दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार
'पवार कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे'
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पवार कुटुंबाविषयी भाष्य केले आहे. कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. त्यांच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले आहे. राजकीय पक्ष एकत्र येतील की नाही हे दोन्ही नेते ठरवतील. तसेच विचार भिन्न असल्यास एकत्र येऊ शकत नाहीत. कुणाला तरी एकाला बदलावे लागेल असे म्हणत एक प्रकारे पवार कुटुंब एकत्र येणार असल्याचा संकेत रोहित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र पाहायला मिळाले. शरद पवार आणि अजित पवारांची शेजारी शेजारी नेमप्लेट होती.परंतु
अजित पवारांच्या सांगण्यावरूनच नेमप्लेट बदलण्यात आली. अजित पवार अगोदर मंचावर आल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगून नेमप्लेट बदलण्यात आली. मात्र या कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या दोघांमधील चर्चा गुलदस्त्यात आहे. या दोघांमध्ये अर्धा तास काय चर्चा झाली असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या दोन पवारांमधील चर्चेमुळे राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.