कोल्हापूर : कोल्हापूरात धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानं विष कालवलं. पळून जाऊन लग्न केलेल्या भाचीवर राग काढण्याचा प्रयत्न मामाने केला आहे. कोल्हापूरातील पन्हाळा तालुक्यात घटना घडली आहे. मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
भाचीने पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावात घडला आहे.महेश ज्योतीराम पाटील असं विष कालवलेल्या मामाच नाव असून पन्हाळा पोलीस ठाण्यात मामाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मामा महेश पाटील सध्या फरार आहे. पोलिसांकडून फरार मामाचा शोध करण्यात येत आहे.
हेही वाचा : बुलढाण्यातील शासकीय वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत धक्कादायक प्रकार
मामाने रिसेप्शनच्या जेवणामध्ये कालवले विष
महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने बदनामी झाल्याच्या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले. विष टाकत असताना आचारी समोर होता. त्यामुळे विष टाकलेलं जेवण कोणाच्याही पोटात गेलं नाही. जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.