महाराष्ट्र: ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडणीत वाढ होणार आहे. पत्नीसह वैभाव नाईकांची एसीबी चौकशी होत आहे. परंतु आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असून पत्नीसह आज नाईकांची एसीबीकडे चौकशी होत आहे. पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असून वैभव नाईक पत्नीसह रत्नागिरीला दाखल झाले आहेत. यावेळी वैभव नाईक यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधलाय:
काय म्हणाले वैभव नाईक :
‘एखाद्याला दबाव आणायचा असेल किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, जे सहकार्य लागेल ते मी त्यांना करेन’, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी यावेळी दिली.
आतापर्यंत दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी काही माहिती पाहिजे असल्यास तशी माहिती देण्याची तयारी देखील त्यांनी बोलून दाखवली. राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा बोलावलं असेल असा अंदाज वैभव नाईक यांनी व्यक्त केला. पहिल्यापासूनच चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचं धोरण ठरवल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
हेही वाचा: Tanaji Sawant : मुलाच्या कथित अपहरण प्रकरणी सावंतांनी कोणती सूत्र हलवली?
काय आहे प्रकरण?
वैभव नाईक यांना 5 डिसेंबर 2022 रोजी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी नाईक चौकशीसाठी हजर झाले होते. तसेच त्यांनी काही कागदपत्रं देखील सादर केली होती. तर अन्य काही कागदपत्रं सादर करण्यासाठी एसीबीकडे वेळ मागितला होता. त्यानंतर 28 जुलै 2023 रोजी त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी वैभव नाईक स्वतः उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले अकाऊंटंट अमोल केरकर यांना कागदपत्रं घेऊन पाठवलं होतं. त्यानंतर मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा वैभव नाईक यांना पत्नीसह एसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.