बीड: सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिन भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीवेळी तिने नामदेव शास्त्री यांच्यासमोर आपली भूमिका मांडली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटतांना पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख कुटूंबियाला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले. अनेक राजकीय नेतेमंडळी देखील या हत्येप्रकरणी अनेक वादग्रस्त वक्तव्य करताय. महंत नामदेव शास्त्री यांनी देखील याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होत याच प्रकरणी आता सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाली वैभवी देशमुख?
'माझ्या वडिलांच्या अंगावर अनेक वार होते' 'माझ्या वडिलांनी कधीही जातीवाद केला नाही' आम्ही न्यायासाठी लढतोय अशा शब्दात वैभवी देशमुख हिने आपली भूमिका मांडलीय. त्याचबरोबर आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरू आहात पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नाही, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासमोर आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले महंत नामदेव शास्त्री ?
मी आरोपींची बाजू घेतली नाही, घेणार नाही. फक्त याला जातीय रंग लागायला नको, अशी अपेक्षा व्यक्त करीत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवानगड खंबीरपणे उभा राहील, असे आश्वस्त केले. सुरुवातीला आरोपींची मानसिकता समजून घ्या म्हणत कड घेणाऱ्या शास्त्रींनी प्रचंड टीकेनंतर एक पाऊल मागे घेतले.
दरम्यान माझ्या वडिलांचे फोटो आजही आम्हाला पाहू वाटत नाही. त्यांची हत्या कशी झाली, आरोपींशी ते कृत्य किती निर्धास्तपणे केले, अशी संपूर्ण घटना समजावून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर वक्तव्य करायला पाहिजे होते, असं देखील सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख म्हणालीय.