Thursday, November 13, 2025 07:23:56 PM

वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू रूमसाठी खरेदी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.

वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू रूमसाठी खरेदी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी व्हावी असे पत्र वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी दिले होते. त्यानंतर आरोग्य सेवा उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून नऊ सदस्य समिती स्थापन केली. या समितीने पाहणी करत खरेदी करण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न केले. १७ बेडसाठी ३ कोटी ७ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. म्हणजेच एका बेडसाठी तब्बल १७ लाख रुपयांच्या रकमेची उधळपट्टी या उपजिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आली होती आणि हे सर्व प्रकरण आता समोर आले आहे. 

 

 

 


सम्बन्धित सामग्री