सोलापूर : सोलापूरातील माळशिरस तालुक्यामधील म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते शहरासाठी पुणे - पंढरपूर रोडवर आधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. याचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार राम सातपुते, मुख्याधिकारी डॉ कल्याण हुलगे,नगराध्यक्षा अनिता लांडगे, तसेच नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : यवतमाळचा शेतकरी मालामाल; झाडाने बनवलं करोडपती
राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी, रस्ते, गटारीसाठी, सभामंडप, मंदिरांचे जीर्णोद्धार यासाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर नगर विकास खात्याच्या योजनेमधून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट 2 कोटी 65 लाख रुपयांची विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हि योजना मंजूर करून आणली असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी म्हेत्रे मळा (वेळापूर),येथे वेळापूर- पिसेवाडी 4 किमी व अन्य 7 रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कामांचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संबंधित ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर येथे भेट देऊन पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतले. यावेळी मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.